विरार येथील रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा भाग कोसळून मोठे दुर्घटना घडली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या दुर्घटने प्रकरण बांधकाम व्यावसायिक नितल साने, शुभांगी भोईर, संध्या पाटील, सुरेंद्र भोईर, मंगेश पाटील या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून नितल साने याला सहा दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.