चिपळूण तालुक्यातील खड्पोली औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या पिंपळी नदीवरील पूल खचला असून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती दिली असून अधिकारी घटनास्थळी पोहोचत आहेत. पर्यायी वाहतूक पेढांबे ब्रीज खडपोली मार्गाने करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.