मंचर शहरात मंचर सुपर मार्केट मध्ये असलेल्या सागर इलेक्ट्रिकल या इलेक्ट्रिक वस्तू व गॅस शेगड्या रिपेरिंग करणाऱ्या दुकानांमध्ये रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान अचानक गॅसचा भडका उडाल्याची घटना घडली आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र सदर घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाला आहे