आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास नौपाडा येथील भास्कर कॉलनीजवळ एक भले मोठे झाड पडल्याची घटना घडली. झाड रस्त्यावर पडल्याने एक बस रस्त्यावर अडकून पडली होती. काही वेळाने नौपाडा रक्षकची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि पडलेले झाड हटवण्याचे काम सुरू केलं. या संदर्भात नौपाडा रक्षकचे प्रमुख किरण नाक्ती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.