राजापूर तालुक्याने यंदाच्या आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या निमित्ताने धार्मिक सलोखाचे एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. हे दोन्ही महत्त्वपूर्ण सण येथे अभूतपूर्व शांतता आणि एकोपाच्या वातावरणात साजरे झाले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी संदेश यातून देण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि पवित्र भावनेने हे सोहळे साजरे केले. जे सामाजिक सलोख्याचे प्रतीक बनले आहे. त्यामुळे दोन्ही समाजात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.