जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणपती बाप्पांचे गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाआरती करून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. या वेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत गणरायाला भक्तीपूर्ण निरोप दिला.