श्री गणेश विसर्जन मिरवणूकीतील कोणत्याही वाहनावर बेकायदेशीरपणे शस्त्र लावल्यास वाहनासह मंडळ पोलिस स्टेशनला जमा करु असा इशारा देत श्री गणेश विसर्जन उत्साहात व पारंपारीक पध्दतीने तसेच शासनाचे नियम पाळून करण्याचे आवाहन वाशिम शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी दि. 02 सप्टेंबर रोजी शहर पोलिस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळ पदाधिकारी यांना केले.