कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते बुधवार 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अनंत डिंगणे, कणकवली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.