संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी ओल्या दुष्काळात सापडला असून शेतकऱ्यांच्या हातून पूर्णपणे उत्पन्न पावसामुळे गेलय,शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून वेळ घालण्यापेक्षा शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करून शंभर टक्के विमा लागू करावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे ५ ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे, तिरुका या गावी पालकमंत्री आले असता छावाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील यांनी निवेदन देऊन मागणी केली