निफाड (वार्ताहर) नाशिक जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी निफाड तालुक्यातील मनसैनिक आणि शिवसैनिकांची एकत्र नियोजन बैठक निफाड बाजार समिती सभागृहात शनिवारी पार पाडली. बैठकीत पुढील संयुक्त जनआक्रोश आंदोलनाची रणनीती, स्थानिक प्रश्न, सहभागाची रूपरेषा व जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर एकत्रितपणे चर्चा करण्यात आली.