पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या पाच दिवसाच्या गणपती विसर्जन होत आहे. अशी माहिती आज रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास दिली आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने एकुण 134 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये 58 ठिकाणी नैसर्गिक विर्सजन ठिकाणे असून 76 ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे.