राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. त्यानिमीत्त उद्या (ता. ६) सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक जलाराम लॉन येथे महागणेशोत्सव आयोजन करण्यात आले होते. गणेश वंदनेसह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा या सांस्कृतिक महोत्सवातून अधोरेखित केला गेला. यावेळी गणपती बाप्पा मोरया च्या गजरात प्रथमच जिल्हा प्रशासनाने महागणेशउत्सव आयोजित केला होता. यानिमित्त प्रत्येक विभागाने नाट्य संगीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.