परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने युवक नेते राजेभाऊ फड यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने वेगळाच उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आणि संताप व्यक्त केला जात असून, लोकभावना आपल्या बाजूने असताना सुद्धा पक्षाने डावलले असल्याने राजेभाऊ फड यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. ही बाब लक्षात घेता सोमवार, दि.28 ऑक्टोबर रोजी ते प्रचंड शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.