रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात ढिसाळ कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या टंचाईमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. सध्या गणेशोत्सव काळात कोकणात रहिवासी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून खोकला सर्दी ताप वायरल चे रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहे. परंतु रुग्णालयाचा ढिसाळ कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या टंचाईचा फटका रुग्णांना बसत आहे.