वसई पश्चिम परिसरात तयार करण्यात आलेल्या स्काय वॉकच्या खालील बाजूस बसवलेल्या फायबर शीट कोसळून खाली पडले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व लोणकळत असलेले व धोकादायक स्थितीत असलेल्या फायबर शीट काढून टाकण्यात आल्या. रेल्वेला लागूनच हा परिसर असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांची ये जा सुरू असते. घटना घडली त्यावेळी कोणीही स्कायवॉक खाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.