नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त माहितीनुसार आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सव अन्य उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे उपस्थित होते.