"गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..." अशा भावनिक जयघोषात देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.डोळ्यांत अश्रू, ओठांवर बाप्पाचे नाव आणि हृदयात भक्तिभाव अशी सगळीच वातावरण निर्मिती झाली होती. एकीकडे विसर्जनाच्या मिरवणुकीत श्री.मारुती गणेश मित्र मंडळ या मंडळाच्या श्री मिरवणुकीने तर ता मृदंगाच्या गजरात वातावरण दुमदुमले होते