यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव बँकेचा कारभार वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला आहे. बँकेने जाहीर केलेल्या 133 कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी नेमलेल्या खाजगी एजन्सीवर थेट पुणे येथील सहकार आयुक्तांनी आक्षेप घेतला आहे.सहकार विभागाने नियंत्रित केलेल्या चार एजन्सी पैकीच कोणत्याही एका एजन्सीला पदभरतीचे काम देण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहे.या आदेशामुळे बँकेच्या महत्त्वाकांक्षी पदभरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे....