समर्थ प्राईड, यवतमाळ येथे शिवसेना यवतमाळ जिल्हा पदाधिकारी पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत नव्या जबाबदाऱ्यांची सूत्रे स्वीकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.