धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गोताणे येथील शेतकरी रामेश्वर पाटील यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवरील अतिक्रमणविरोधात न्याय न मिळाल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. गट क्रमांक ५५४/१ वर स्थानिकाने दादागिरीने बांधकाम सुरू करून धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रशासकीय अनास्थेला कंटाळून घेतलेले टोकाचे पाऊल पोलिसांनी वेळीच हाणून पाडल्याने अनर्थ टळला.