नौपाडा भास्कर कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक कट्टा चोरीला गेला असल्याचा आरोप मनसेने केला होता. विकासकाने इमारत बनवण्यासाठी हा ज्येष्ठ नागरिक कट्टा तोडला होता. मात्र आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास या ठिकाणी माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी भेट दिली असून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.