रविवारी दुपारी १ वाजता गोडोली येथील हॉटेल लेक व्ह्युवच्या सभागृहात गाडोली येथील साईशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसधारण सभा संस्थेचे चेअरमन व्यंकटराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष राजू घुले, जयश्री मोरे, जीवनधर चव्हाण, अॅङ योगेश मोरे, विपूल मोरे, डॉ. युवराज सानप, संदीप मांडवे, रवी पवार आदी उपस्थित होते. सभासदांना १० टक्के लाभांशचे वाटप करण्यात आला.