आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून चोरी गेलेल्या रोहित्राच्या जागी शब्द दिल्याप्रमाणे भाडेतत्वावर रोहित्र बसवून उजनी उपसा जलसिंचन योजना आज २४ ऑगस्ट सुरु करण्यात आली असून आजपासून जवळके, धोंडेवाडी, शहापूर व बहादराबाद येथील बंधारे भरण्यास सुरुवात झाली आहे.आ.काळे यांच्या प्रयत्नांतून कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निळवंडे कालव्यातून बंधारे, पाझर तलाव व ओढे भरून देण्यात आले असून उर्वरित गावांतील बंधारे, पाझर तलाव व ओढे उजनी उपसा जलसिंचन योजनेतून