दोन दिवसाच्या ब्रेकनंतर यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नदी नाल्याला पूर आला आहे. बोरीसिंह येथील अनिल रेडे हे 12 सप्टेंबरला शेतामध्ये गेले होते. परंतु मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतात शिवबा नाल्याला पूर आला आणि त्यात पाय घसरून पडल्यामुळे ते पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.