वैद्य नगर परिसरातील सविता उजवणे आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काकू व त्यांची चुलत बहीण असे तिघेजण जेवण झाल्यावर फिरत असताना आर्णी रोडने येणाऱ्या एम एच 29 सी एल 2765 या क्रमांकाच्या मोपेड एक्टिवा दुचाकी वाहनाने सविता उजवणे यांना धडक दिली. धडक बसल्यानंतर सदर महिला ही खाली पडून जखमी झाली. या प्रकरणी सदर महिलेची मुलगी आकांक्षा ही ने दुचाकी चालकाविरुद्ध अवधूतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली.