टेमनी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी समाजसेवक राजेश आंबेडारे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील ग्रापंचायत भवनात अध्यक्ष निवडीसाठी ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती.सभेत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेत त्यांची तंटा मुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. आंबेडारे यांची निवड होताच गावकऱ्यानी रैली काढून त्यांचे जल्लोषात स्वागत केले आंबेटारी यांच्या निवडीबद्दल पोलीस पाटील प्रियंका नांदणे उपसरपंच शैलेश डोंगरे माणिक पटले यांनी अभिनंदन केले.