मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिरडी शहरातील सकल मराठा समाज बांधव एकवटले आहेत.मुंबईतील आंदोलन करत्या मराठा समाज बांधवांसाठी शिरडीतून चटणी भाकरीची शिदोरी रवाना करण्यात आली आहे.शहरातील शंभूराजे प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ही शिदोरी पाठवण्यात आली. काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित असल्याने त्यांना अन्न पुरवठ्याची गरज आहे यासाठी शिरडी समाज बांधवांनी एकत्र येत चटणी भाकरीची व्यवस्था केली.