पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार मध्यरात्री पुलगाव उपविभागात रात्रगस्त आणि पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. अवैध दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा व कार जप्त करण्यात आली आहे असा एकूण जुमला किंमत 5.60 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे असे आज 27 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे