इटियाडोह धरणाचे माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी माननीय प्रजीत नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन संपन्न झाले.गेल्या काही दिवसांमधे झालेल्या जोरदार पावसामुळे जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. हा निसर्गसोहळा पाहण्यासाठी याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.