लालबागचा राजा विराजमान झाल्यानंतर मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी संवाद साधला. रात्री साडे दहा ते अकरा नंतर विसर्जन होऊ शकतं, अशी माहिती सुधीर साळवी यांनी दिली. लालबागच्या राजावर करोडो भाविकांची श्रद्धा असल्यानं सकाळी एक प्रयत्न केला मात्र तो थांबवल्याचं ते म्हणाले. यावेळी साळवी यांनी माध्यमांचे आभार मानले.