खासदार रविंद्र वायकर यांनी के/पूर्व विभाग कार्यालयात गणेश विसर्जन २०२५ संदर्भात आज दिनांक २२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र वाणी यांना त्यांच्या सेवा काळातील उत्तम कामगिरी बद्दल नुकताच राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले म्हणून खासदार रविंद्र वायकर यांनी त्यांचा सत्कार केला. या बैठकीस सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, माजी नगरसेवक प्रविण शिंदे, अग्नीशमन दलाचे अधिकारी उपस्थितीत होते.