गणेश उत्सव ईद-ए-मिलाद यासह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी घाटंजी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च घाटंजी शहरातील जुने बस स्थानक गुप्ते दवाखाना इंदिरा चौक मस्जिद लाईन शिवाजी चौक अग्रसेन चौक या मार्गे काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,अधिकारी, पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचा सहभाग होता.