शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण परिसरात सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची सराईत दरोडेखोर लखन उर्फ महेश पोपट भोसले याच्यासोबत शनिवारी (दि.३०) सायंकाळी चकमक झाली. या चकमकीत भोसलेने पोलिसांवर चाकूने हल्ला चढवला, त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात भोसले जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.