साटेली-भेडशी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मध्ये सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घेराव घातला. देशद्रोही कृत्य करणाऱ्या व्यावसायिकाचा व्यवसाय बंद करावा असा ठराव ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला होता. त्यास जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतला पञ पाठवून अशा प्रकारचा ग्रामपंचायतला ग्रामसभेचा ठराव घेता येता येणार नाही असे पत्र ग्रामपंचायत मध्ये पाठवल्यानंतर ग्रामस्थांनी जाब विचारत आक्षेप घेतला आहे. यावेळी तहसीलदार राजमाने मॅडम, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत उपस्थित होते.