गणपती बाप्पांची दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशी निमित्त गणपती बाप्पांना पालघर जिल्ह्यात भावपूर्ण निरोप देण्यात आला. भर पावसात भक्तांनी गणपती बाप्पांची वाजत गाजत, आकर्षक देखावे आरास तयार करून मिरवणूक काढली. ढोल ताशाच्या तालावर भक्तगण थिरकल्या पहावयास मिळाले. नदी, तलाव, गणेशकुंड कृत्रिम तलाव, समुद्र याठिकाणी जिल्ह्यात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर याचा जयघोष करा भक्तांनी गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला.