18 महिने होऊन देखील निघालेल्या जीआर ची फुटता झाली नसल्यामुळे संविधान चौकात राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. आज दिनांक 8 सप्टेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन संविधान चौक येथे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यादरम्यान नारेबाजी देखील करण्यात आली. यावेळी नागपूर जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका यामध्ये सहभागी झाल्या होत्या.