फलटण तालुक्यातील सुरवडे, येथील पारधी समाजाच्या एका युवकाला, विनाकारण खोटे गुन्हे टाकून त्रास दिला जात आहे, असा आरोप करत सदर युवकाची आई संगीता महावीर शिंदे यांनी, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, आम्ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहे, त्यामुळे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नका, अगर टाकल्यास जिल्हाधिकारी कार्यासमोर कुटुंबासहित आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी आज, शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.