माजी राज्यमंत्री बच्चू कडू भंडारा जिल्हा दौरावर आले असल्याचे माहित होताच जिल्ह्यातील विविध अपंग, निराधार संघटनेच्या विविध पदाधिकारी यांनी माजी आमदार बच्चू कडू यांची भेट घेत त्यांना आपली कैफियत सांगितली. अनेकांनी तर बच्चू कडू यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत माजी आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते भंडारा येथील सर्किट हाऊस येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला. माजी आमदार बच्चू कडू यांनी अनेकांच्या पक्ष प्रवेश करून घेत त्यांना पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगितले.