Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे महाराष्ट्रभरातून मराठा बांधव हे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला दाखल झालेले आहेत अशातच वैजापूर तालुक्यातील मराठा आंदोलन देखील आझाद मैदानावर मनोज पाटील जरांगे यांच्या समर्थनार्थ दाखल झाले असून शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आझाद मैदानावर मराठा आंदोलन पोहोचल्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी त्यांच्या हातामध्ये राजकारण्यांचा बाप अशा आशयाचे फलक देखील दिसून आले.