पौड गावातील एका शाळेत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका पालकाने विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून विद्यार्थ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.