उक्षी- मिरजोळे- रत्नागिरी मार्गावरील उक्षी करबुडे घाटात एका चार चाकी गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती छोट्या दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले पती-पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास घडली .ज्ञानेश्वर गुरव वय ५९ आणि त्यांच्या पत्नी वनिता ज्ञानेश्वर गुरव वय ५१ हे दाम्पत्य यांच्या एम एच झिरो आठ एएक्स १०१५ या क्रमांकाच्या गाडीतून उक्षीहून रत्नागिरीच्या दिशेने जात होते.