पुण्यात गणपती बाप्पांच्या आगमनाइतकी विसर्जन मिरवणुकीलाही विशेष महत्त्व असते. यंदा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, त्यात एका पथकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरी वाडा गणपतीच्या ढोल ताशा पथकाने वादकांसाठी पोस्टमनचा पोशाख तयार केला आहे.