राधा कृष्ण गणेश मंडळ मुंडीपार यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज एक विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दुर्गा सेवा भजन मंडळाच्या कलाकारांनी भक्तिपूर्ण भजने सादर करत उपस्थित श्रोत्यांना अध्यात्मिक आनंद दिला.कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने गणेश वंदनेने झाली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन,अभंग, गवळणी,आणि भक्तिगीते सादर करण्यात आली.