कनेर फाटा विरार फाटा परिसरात टोकरे ग्रामपंचायत हद्दीत गटारांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. यामुळे पादचारी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या अनाधिकृत बांधकामावर महानगरपालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई केली आहे. जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. शंभर अधिकृत बांधकाम केलेले दुकानांचे शेड या कारवाईत तोडण्यात आले असून गटार आणि पादचारी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.