पीएमपी वाहक महिलेला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका प्रवाशाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धीरज रामचंद्र ब्रिजवासी (वय ३२, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीएमपी वाहक महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.