गौरी गणपती हा सण म्हणजे आनंदाची पर्वणी. दिनांक 31 ऑगस्ट रोजी महालक्ष्मीचे आगमन झाले. तालुक्याचा जिल्ह्यात घरोघरी अगदी थाटामाटा भक्ती भावाने ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले. त्यानंतर दुसरा दिवस एक सप्टेंबर या दिवशी प्रत्येकाने ज्येष्ठा गौरीचे सायंकाळी पूजन करून नैवेद्य दाखवला त्याचबरोबर आरती करण्यात आली. ज्येष्ठा गौरीला विविध गोड धोड पदार्थ, त्याचबरोबर ज्येष्ठा गौरीला आवडणारा सोळा भाजीची भाजी म्हणून नैवेद्य दाखवण्यात आला.