पंचकृष्ण ज्ञान प्रबोधन सत्संग मंडळ, कोंढाळी यांच्या वतीने आयोजित केलेला श्री गोविंदप्रभू महाराज अवतार दिन तथा महाउपहार सोहळा अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील तसेच दूरदूरवरून आलेल्या अनेक श्रद्धाळू भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विविध धार्मिक उपक्रम, कीर्तन, भजन, प्रवचन आदींच्या माध्यमातून श्री गोविंदप्रभू महाराजांच्या जीवनकार्याचा आणि उपदेशांचा गौरव करण्यात आला.