खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आज दुपारी एका ३३ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी आणि व्हॉट्सॲपवर शेअर केलेला संदेश यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.मृत तरुणाचे नाव भीमा बबन रेणके (वय ३३, रा. राक्षेवाडी) असे आहे. सिद्धेश्वर मंदिराजवळ त्याने गळफास घेतला.