शहरातील मापरवाडी रस्त्यावरील त्रिशूळीजवळ राहणाऱ्या दिपक दगडू बर्षे (३५) यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दरम्यान घडली. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच आजूबाजूच्या रहिवाशांच्या सहाय्याने त्यांना उतरवून घेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.