गणपती उत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या 'मोदी एक्सप्रेस ट्रेन सेवेबद्दल बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज रविवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही कोकणातील लोकांसाठी 'मोदी एक्सप्रेस' सारखी सेवा देत आहोत. गणेश चतुर्थीच्या वेळी, जेव्हा कोकणातील लोक त्यांच्या गावी प्रवास करू इच्छितात, तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी 'मोदी एक्सप्रेस' सेवा सुरू केली. अशी प्रतिक्रिया बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.